आ.कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह सर्व पदाधिकारी बरखास्त

0
44

गोंदिया,दि.१४-प्रहार जनशक्ती पक्षासोबतच प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षासंह सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यावर सोपविलेल्या पदापासून सर्वांना २२ फेबुवारीपासून मुक्त करण्यात आले असून महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात अधिकृत पदाधिकारी नसल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी कळविले आहे.प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व नव्या व जुन्या कार्यकारीणीला बरखास्त करण्यात आले असून कुणी प्रहारच्या नावावर कुठल्याही कार्यालयात qकवा गैरशासकीय कार्यालयात त्रास देत असल्यास मुख्य कार्यालयाला माहिती कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.विविध जिल्ह्यातून आलेल्या तक्रारीच्या आधारावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.पुर्व विदर्भातील काही जिल्ह्यात शासकीय अधिकाèयांना त्रास देण्याचे काम प्रहारचे पत्र देऊन करण्याचा काहींनी सपाटा लावला होता.त्यावर आता आळा बसण्याची शक्यता असून २२ फेबुवारीपासूनच सर्व पदे बरखास्त झाल्याने त्यांनतर आलेल्या कुठल्याही पत्राची दखल घेण्यात येऊ नये असेही कळविण्यात आले असून २३ फेबुवारीपासून नव्याने संदस्य नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. पक्षाचा व संघटनेचा ज्यास सदस्य व्हायचे आहे त्यांनी आधी २ हजार रुपयाचे धनादेश प्रहार जनशक्ती पक्ष या नावे पाठवून आधी आपली नवी सदस्यता घेण्याचेही आवाहन केले आहे.सदस्यता नोंदणी झाल्यानंतरच जिल्हा,तालुका व गावपातळीवरील पदाधिकारी यांची निवड केली जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.