राजु केंद्रे यांची मुख्यमंत्री फेलोशिपसाठी निवड

0
14

बुलडाणा,दि.१४-गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करुन ग्रामीण भागांना शास्वत विकासासाठी स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने काम करणाèया मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप या नाविन्यपुर्ण संकल्पनेसाठी जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील qपपरी खंदारे येथील होतकरु युवक राजू केंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.आधीपासूनच अधिकारी होऊन गावविकास करण्याची मनात इच्छा असलेल्या प्रतिभावान युवकांची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.मेळघाटसारख्या आदिवासी भागात मैत्री संस्थेमार्फेत सामाजिक कार्य करीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणाèया राजूला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची संधी असतानाही सामाजिक कार्यात स्वतला वाहून घेतले.बाबा आमटे यांच्या छावणीतून सुरु केलेल्या समाजकार्याची खरी पावती मुख्यमंत्री फेलोशिपकरीता निवड झाल्याने झाली आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यात असलेल्या दुष्काळ निवारण कार्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे.३ एप्रिलपासून पुणे येथील यशदामध्ये राजू केंद्रे हे प्रशिक्षण घेणार आहेत.