आंघोळीसाठी गेलेला १२ वर्षीय मुलाचा कालव्यात वाहून मृत्यू

0
11

आमगाव,दि.१९- आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाèया कुंभारटोली गावाजवळून वाहणाèया कालव्यात आपल्या मित्रासोंबत आंघोळीसाठी गेलेला १२ वर्षीय मुलगा वाहून जाऊन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी(दि.१८)घडली.त्या मूलाचे नाव उदय सोनटक्के असे आहे.उदयच्या शोधासाठी कालव्यात धरणातून सोडले जाणारे पाणी थांबवून तपास कार्यास सुरवात करण्यात आली होती.उन्हाळी शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जात असून उदय हा आपल्या पाच मित्रासोंबत गावाजवळील कालव्यात आंघोळीसाठी गेला होता.कालव्यातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो वाहून गेला दरम्यान सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली असता शेतातील व कालव्याशेजारी असलेले नागरिक धावून आले.परंतु उदय तोपर्यंत खुप दूर वाहून गेलेला होता.