रविवारला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूरात बैठक

0
9

नागपूर,दि.१८-राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसीत मोडणाèया सर्व जात संघटनांच्या वतीने उद्या रविवार१९ मार्च रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ७ आगस्त २०१७ नवी दिल्ली येथे घेण्यात येणार आहे.या अधिवेशनाबद्दल बैठकित चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व ओबीसी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी,समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प्राचार्य डॉ बबनराव तायवाडे , राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ खुशाल बोपचे , निमंत्रक सचिन राजूरकर , प्राचार्य डॉ अशोकराव जीवतोडे , प्रा. शेषराव येलेकर, खेमेंद्र कटरे, डॉ अजय तुमसरे,बबनराव फंड,जीवन लंजे, मनोज चव्हाण, विजय पिदुरकर, गुणेश्वर आरीकर, शरद वानखेडे, बबलू कटरे , विनय डहाके,प्रा संजय पन्नासे ,क्रिष्ण देवासे सुनील मापले प्रकाश साबळे ,सुषमा भड, उज्वला महले, निलेश खोडे, निकेश पिणे,रुचीत वांढरे,रोशन कुंभलकर,विनोद हजारे,श्यामल चन्ने यांनी केले आहे.