युवक शेतीत आला, देश सुजलाम् झाला-जी.आर.शामकुवर

0
9

लाखनी,दि.१९:- युवक हा या देशाचा कणा आहे आणि आपला भारत देश कृषिप्रधान आहे त्यामुळे आजचा युवक तंत्रस्नेही होऊन शेतीत जर आला तेव्हा देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् झाला. असे प्रतिपादन वैज्ञानिक जी. आर. शामकुवर यांनी केले.शनिवारला एग्रोटेक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन समर्थ मैदान लाखनी येथे पार पडले. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ शेतकरी इस्तारीजी कापगते तर उपस्थित कार्यक्रमाध्यक्ष राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटनीस अविनाशजी ब्राम्हणकर, तालुका कृषी अधिकारी पद्माकरजी गिदमारे, दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलालजी चौधरी, व्यवस्थापक करणजी रामटेके, अर्बन बँक संचालक पप्पुभाऊ गिरेपुंजे, बाजार समिती संचालक रामकृष्णजी वाढई, उद्योजक अतूल पाटील भांडारकर, महोत्सव आयोजक इंजि. विशाल भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध नामांकीत कंपन्यांचे जवळपास ८० स्टाल्स आहेत. टिम एग्रोटेकने या कार्यक्रमाचं उत्कृष्ठ आयोजन केलेलं असून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी उपस्थिती व पसंती दर्शवली.