श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानातर्पे सर्वजातीय सामुहिक विवाह सोहळा ५ एप्रिलला

0
9

गोरेगाव,दि.१९: : पुर्व विदर्भात प्रसिध्द तिर्थक्षेत्र बघेडा (तेढा) येथील श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदा २९ मार्चपासून चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाही जवळपास १५०० हून अधिक ज्योती कलश स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २५ वर्षापासून देवस्थान समितीतर्पेâ सुरू केलेल्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा निरंतर कायम ठेवत ५ एप्रिल रामनवमीच्या पर्वावर सायंकाळी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी दिली. या उत्सवासाठी समितीचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.
तालुक्यातील बघेडा (तेढा) येथील श्री सुर्याटोला मांडादेवी देवस्थान समिती चैत्र नवरात्रोत्सवसाठी सज्ज झाली आहे. निसर्गरम्य वातावरणातील तिर्थक्षेत्राला भाविक हजारोच्या संख्येत दररोज दर्शनासाठी येतात. त्यातच उत्सवदरम्यान भाविकांची अलोट गर्दी असते. या अनुषंगाने देवस्थान समिती सेवारत असते. यंदा २९ मार्चपासून चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. २९ मार्च रोजी ज्योतिकलश स्थापित करण्यात येणार आहे. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित आहेत. या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येत वर-वधूनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष भैय्यालाल सिंदराम, सचिव विनोद अग्रवाल, मुन्नालाल असाटी, सिताराम अग्रवाल, डॉ.लक्ष्मण भगत, कुसन घासले, डॉ.जितेंद्र मेंढे, गणपतलाल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, पोषण मडावी, हुवूâमचंद अग्रवाल, योगराज धुर्वे, श्याम ब्राम्हणकर, शिवा सराटे, सखाराम सिंदरा, शालीराम ऊईके, रामदास ब्राम्हणकर यांनी केले आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याNया वर-वधूंनी मो.९६७३९२२०००, ९७९४५८०२१७ या क्रमांकावर संपर्वâ करावे, असे कळविण्यात आले आहे.