शिवसेनेचा वतीने कर्जमुक्तीसाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

0
24

साकोली दि.२२(berartimes.com)- शेतकरी अनेक वर्षापासून कर्जाच्या खाईत फसले आहेत, त्यामुळे ते आपल्या मुलांना शिकऊ शकत नाही. अल्पशा आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहत नाही.अल्पशा आजाराने मरून जातात. ही वस्तुस्थिती आहे.शेती परवडत नाही म्हणुन मोलमजूरी करतात.दुसरीकडे शेतीसाठी घेतलेला कर्ज वाढतच जातो.अशा देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रमाण दिवसेंदिवस वाढने योग्य नसल्याने भंडारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांचा हितासाठी राज्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करावे व शेतमालाला योग्य भाव द्यावे, २४ तास शेतकऱ्यांना वीज द्यावे व शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.मोर्च्यात शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख संजूय रेहेपाड़े, राजेश बुराड़े, संदीप वाकडे, पुरुषोत्तम सोनवाने, भरत वंजारी, युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, वाहतूक सेना प्रमुख दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अमित एच. मेश्राम, जिल्हा विद्यार्थी सेना जितेश ईखार, जिल्हा कार्यकारणी सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख प्रकाश मेश्राम, हंसराज अगाशे, अरविंद बनकर, राजू ब्रम्हंकर, माजी तालुका प्रमुख नरेश करंजेकर, प्रमोद मेंढे, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितिन सेलोकर, नरेश बावनकार, युवासेना तालुका प्रमुख प्रणय कांबळे, किशोर चन्ने, शुभम बरापात्रे, विभाग प्रमुख हितेश बडवाईक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.