गोठणगावला जनजागरण मेळावा

0
15

अर्जुनी-मोरगाव, दि.२६-: गोठणगाव येथे आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक राकेशचंद्र कलासागर, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, सुशिला हलमारे, सकुंतला वालदे, ग्रा.पं.सदस्य तथा प्रतिष्ठीत नागरिक उपस्थितीत होते.
अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील जनतेला शासकीय योजना, वैद्यकीय सुविधा देणे व ग्रामीण भागातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा व विविध माध्यमाने लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात वैद्यकीय शिबिर आशा हॉस्पीटल कामठी व सत्य सामाजिक संस्था देवरी व मोबाईल मेडीकल युनिट अर्जुनी-मोरगाव, भगवती शिक्षण संस्था मेंढा यांच्या द्वारे तपासणी करून ६५० रुग्णांना औषध वाटप करण्यात आले. पं.स.अर्जुनी-मोरगाव द्वारो गरजुंना मोफत ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. महसूल विभागाद्वारे विविध दाखले देण्यात आले.विशेष करून महिलाकरीता रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व पुरुषाकरीता कबड्डी स्पर्धा व भरती पूर्व परीक्षा घेण्यात आले. मेळाव्याला उमरपायली, जांभळी, गंधारी, बोंडगाव, सुरबन, प्रतापगड, कढोली येथील नागरिकाची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस दुरक्षेत्र गोठणगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.