व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने नरेश रहिले सन्मानित

0
12

आमगाव दि.२६-:व्यसनमुक्ती क्षेत्रातील कामगिरीसाठी २0१६-१७ या वर्षीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नरेश रहिले यांना देऊन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सन्मानित करण्यात आले. १९ मार्च रोजी अमरावती येथे झालेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले.सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, अभिनेत्री निशिगंधा वाड, मुक्ताताई पुणतांबेकर, समाजकल्याण आयुक्त पीयूषसिंह आदी मान्यवर यावेळी मंचावर होते. नरेश रहिले व त्यांच्या सहचारिणी राजश्री रहिले, सुनंदा हुकरे, कर्णिका रहिले यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.