भरोसा सेल ही नागपूरने राज्याला दिलेली भेट

0
11

नागपूर दि.६: पीडित महिलांना दिलासा देतानाच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शहर पोलिसांनी निर्माण केलेला भरोसा सेल ही राज्याला नागपूर पोलिसांनी दिलेली महत्त्वपूर्ण भेट आहे, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सदर छावणी, येथील पटेल बंगल्यात (डीजी कॅम्प) नागपूर पोलिसानी सुरू केलेल्या उत्कृष्ट पोलीस सेवा अध्ययन केंद्राचे (एन कॉप्स एक्सलन्स) उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.