वर्षभरापासून बंद सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना काय सांगणार?

0
13

सीसीटीव्ही कॅमेरेच पारदर्शक भष्ट्राचाराचे बोलते उदाहरण
गोंदिया,दि.६(berartimes.com) : गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात ३ एप्रील रोजी झालेल्या सर्वसाधरण सभेत राष्ट्रवादी कॉग्रेंसच्या सदस्या आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यांच्यातील हाणामारीचे पडसाद आजही कायम आहेत.त्यातच या हाणामारीची सुरवात कुणी केली यासाठी सभागृहात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर नजर गेली.परंतु हे कमेरे गेल्या तीन चार महिन्यापासूनच नव्हे तर तब्बल वर्षभरापासूनच बंद असल्याचे बोलले जात आहे.कारण याच सभागृहात गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांची प्रकिया करण्यात आली होती.त्या प्रक्रियेची फुटेज सुध्दा मागण्यात आली होती.ते फुटेज सुध्दा बेरार टाईम्सला सामान्य प्रशासन विभाग देऊ शकले नाही.यावरुन हे बंद सीसीटीव्ही कॅमेरे पोलीसांना तपासात काहीच सांगणार नाही हे स्पष्ट झाले आहे.फक्त शासकीय पैशाची उधळपट्टी करुन मqलदा खाण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सामान्य प्रशासन विभागाला सोयीचे झाले आहे.त्या बंद सीसीटीव्हीच्या देखभालीसाठी मात्र यावर्षीच्या संभावित अर्थसंकल्पात परत २ लाखाची तरतुद करण्यात आली आहे.सीसीटीव्हीच्या नावावर जिल्हा परिषदेत चांगला आणि पारदर्शक भ्रष्टाचार मात्र सुरु असल्याचे दिसून आले.
या मारहाणीचे छायाचित्रण सभागृहात त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याची अफवा एका माध्यमाने पसरविल्याने सीसीटीव्ही फुटेजच्या मागे लागल्याचे वृत्त आहे. मात्र, जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरांबद्दल माहिती घेतली असता, सभागृहात असलेले चारही सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद होते. त्यामुळे या बंद कॅमेरातून काय निष्पण्ण होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. हे कॅमेरे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या कार्यवृत्ताचे चित्रांकण करण्यासाठी लावण्याची परवानगी आधी सभागृहाची घ्यावी लागते.परंतु तशी परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नसतानाही सभागृहात सामान्य प्रशासन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे हे जि.प.सदस्यांचा व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखेच झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्हा परिषद विविध कारणामुळे प्रकाशित राहिली आहे.दोन तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनाचा अपघात झाला होता.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनाला भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत अपघात झाला.ते वाहन पुर्णता मोडकळीस आले आहे.तसेच महिला बालकल्याण सभापती विमल नागपुरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य खुशबू टेंभरे यांच्यातही महिला बालकल्याण विषय समितीच्या सभेत पोषण आहार,अलमारी खरेदीला घेऊन चांगलेच भांडण झाले होते. त्यावेळी सभापती नागपुरे यांनी टेंभरे यांना गेट आऊट म्हटले होते. तेव्हाही हे प्रकरण विभागीय आयुक्तार्पंयत पोचले होते.त्यामुळे झोलबा पाटलाचा वाडा या शब्दाला असवैधांनिक म्हणणाèयाच्या तोंडी गेट आऊट ,आय से गेट आऊट हे शब्द सवैंधानिक ठरले आहेत.या शब्दावरुनच संबधित पक्षाच्या सदस्यांची मानसिकता सुध्दा किती दुषीत आहे हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या मारहणा प्रकरणात सभागृहातील हजर पदाधिकारी यांचे बयाण नोंदविण्यात आले तर राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनिता सुधाकर मडावी यांच्या तकदृारीवरून सभापती परसराम कटरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती, जमाती कायद्यांतर्गत कलम ३२४ सहकलम ३(१) , ३ (२),(५),(१) अंतर्गत गुन्हा गदृामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. तर याच पदृकरणात सभापती पी.जी. कटरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सभागृहाचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करून सदस्याने चिथावनी दिल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंगेसचे सदस्य गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, मनोज डोगरे, कैलाश पटले व दुर्गा तिराले यांच्या विरुद्ध ३२४, ३५५,४२७ व १०९ कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यांना ५ एप्रिल रोजी जामीन मंजुर करण्यात आला आहे.