ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार

0
10

गोंदिया दि.६:: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूूर मंडळांतर्गत कळमना-गोंदिया-दुर्ग मार्गावर कळमना-कामठीदरम्यान व दुर्ग-गोंदिया-कभमना मार्गावर दुर्ग-रसमडादरम्यान डाऊन व अप लाईन्सच्या देखभाल कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.
कळमना-गोंदिया-दुर्ग मार्गावर कळमना-कामठी मध्यडाऊन लाईनवर ७ व २१ एप्रिल तसेच ५ व १९ मे २०१७ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ११.४५ वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर दिवसी इतवारी स्थानकावरून गाडी (५८११२) इतवारी-टाटानगर पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने रवाना करण्यात येईल. याशिवाय गाडी (६८७४१) दुर्ग-गोंदिया पॅसेंजर, गाडी (६८७४३) गोंदिया-इतवारी पॅसेंजर, गाडी (६८७४४) इतवारी-गोंदिया, गाडी (६८७४२) गोंदिया-दुर्ग, गाडी (६८७१४) इतवारी-गोंदिया व गाडी (६८७१५) गोंदिया-इतवारी रद्द राहणार आहेत. तसेच दुर्ग-गोंदिया-कलमना मार्गावर दुर्ग-रसमडाच्या मधील अप लाईनवर १४ व २८ एप्रिल तसेच १२ व २६ मे २०१७ रोजी रात्री ८.४० ते रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचे ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सदर दिवसी गाडी (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू रद्द राहील. गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर एक्सप्रेसला दुर्गमध्ये एक तास व गाडी (५८१११) टाटानगर-ईतवारी मेमू दुर्गमध्ये ३० मिनिटे नियंत्रित करून पुढे रवाना करण्यात येईल.
याशिवाय गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू दुर्गमध्ये समाप्त करून पुढील दिवसी दुर्गवरूनच गाडी (६८७२४) गोंदिया-रायपूर मेमू बनवून रायपूर व गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड मेमूला दुर्गमध्ये समाप्त करून पुढील दिवसी दुर्गवरूनच गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर मेमू बनवून रायपूर रवाना होईल, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकांनी दिली आहे.