कन्हैयाकुमार आज गोंदिया व नागपुरात

0
5

गोंदिया,दि.13: ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा राष्ट्रीय नेता कन्हैयाकुमार पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त गुरुवारी नागपुरात येणार आहे. कॉंग्रेसनगर येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता कन्हैयाकुमारलिखित ‘बिहार से तिहाड’ या पुस्तकाच्या मराठी अनुवाद आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार आणि पुस्तकाचे अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे उपस्थित राहणार आहेत. गोंदिया येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात कन्हैयाकुमार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता इंदोरा येथील नामांतर स्मारकापासून निघणार्‍या स्कूटर रॅलीला कन्हैयाकुमार हिरवी झेंडी दाखविणार असून ९.३0 वाजता दीक्षाभूमीला भेट देणार आहे.