शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहनांना पेटविले.

0
8

नागपूर,13- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहातील दुचाकीवाहनांना काही अज्ञात युवकांनी आग लावून पेटविल्याची घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे. या वसतिगृहाच्या परिसरात विद्यार्थ्यांची दुचाकी वाहने ठेवलेली असतात. या वाहनांना रात्री अडीच वाडेच्या सुमारास काही अज्ञात युवकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना घडली. मात्र, विद्यार्थ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने आगीवर नियंक्षण मिळविण्यात यश आले. केवळ दोनतीन वाहनाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अज्ञात आरोपीचे कृत्य कैद झाल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश येणार, अशी आशा बाळगली जात आहे. दरम्यान यापूर्वी सुद्धा अशा घटना झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.