गेवराई पं. स. च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार

0
27

सर्व साधारण सभेत घेणार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव

गेवराई/बीड,13(विशेष प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा गेवराईच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 109 वी जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, नुकताच पदभार स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत असे की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा गेवराईच्या वतीने गेवराई पंचायत कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त गेवराई पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती अभयसिंह पंडित साहेब, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, सदस्य श्री शाम कुंड, श्री जगण अडागळे, दीपक सुरवसे, सिद्धार्थ नरवडे,संजय जाधव,गटविकास अधिकारी राजगुरू साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व सत्कारमूर्ती यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष श्री विष्णु आडे यांनी अंशदान पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना किती घातक आणि अन्यायकारक आहे, हे सभागृहाला पटवून देत संघटनेने मागील दोन वर्षापासून आक्रोश महामोर्चा,धरणे आंदोलन, निवेदन तसेच बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढलेला मोर्च्याचा आढावा घेतला.
यावेळी पं.स.सदस्य प्रा. शाम कुंड साहेब यांनी पुढील सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र शासनाची 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ठराव घेऊन त्याची एक प्रत महाराष्ट्र शासनाला पाठविण्याचे आश्वासन संघटनला दिले. शासनाच्या या अन्यायकारी योजनेच्या विरोधात लोक चळवळ उभी करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन उपसभापती श्री भीष्माचार्य दाभाडे यांनी केले.
2006 पासून सुरू असलेली ही पेन्शन योजना फसवी असून कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळ करणारी आहे. वृद्धापकाळी कर्मचाऱ्यांना कोणतीही आश्वासित आर्थिक तरतूद या योजनेत दिसून येत नाही. मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. जो पर्यन्त शासन कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करीत नाही, तोपर्यंत त्यांच्या पगारातून डीसीपीएसची कपात करू नये आणि जुनी पेन्शन लागू करावी असे ठराव सभागृहात पास करून शासनाकडे पाठवू”, असे आश्वासन नवनिर्वाचित सभापती अभयसिंह पंडित यांनी यावेळी बोलताना दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन तालुका अध्यक्ष जितेंद्र दहिफळे, सरचिटणीस प्रशांत मस्के,कार्याध्यक्ष सचिन दाभाडे, कोषाध्यक्ष महेश पघळ उपाध्यक्ष नामदेव चौधर, रमेश पवार, अमोल आतकरे, तालुका मार्गदर्शक कैलास अरबड, आदिनाथ भारती, घोडके विकास,कुटे दयावान,आव्हाड हेमंत,जायभाये सर ,राठोड आबा,पवार रमेश,भांडवलकर दिलीप,मेंडके अनिल, मोहळकर रघुनाथ,पवळ सचिन,फसले नितीन, ढेरे अविनाश, पवार अर्जुन,राठोड प्रकाश ,चव्हाण कैलास,पवार संतोष,चव्हाण रामराव,शेख शौकत,ससाणे महेश,नवले शाम,चव्हाण संजय,प्रधान संतोष,जगताप योगेश,भोजगुडे अशोक,सावळकर शैलेश,कांबळे संदीप,खिल्लारे सचिन,कांबळे सौदागर,पोपळे भारत,पाटील गुलज,फुंदे संजय,सानप गणेश,क्षिरसागर उद्धव,मावची अनिल,पोपळे गुलज,जाधव सुखदेव,चौधरी बाळासाहेब,मस्के महादेव,मस्के सर घुमरे विद्यालय,शिंदे सर,शेख सर,चादर आसाराम,आजबे सर राहेरी,ओव्हळ सर,सोनवणे लहू, मोरे दिपक, ठोंबरे विकास,काळे शरद,घोडके प्रविण, घोडके हरिभाऊ,मार्कड आबा,प्रेम सिडाम,नागरगोजे सर,ढाकणे सर,गवळी सर,वाघमारे सर,सय्यद सर ,माने सर,मु अ श्री दुधाळ सर,पतसंस्था संचालक श्री कुडके दाजी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचलन श्री प्रशांत मस्के यांनी केले. उपस्थितांचे आभार कैलास अरबड यांनी मानले.