सगरोळी सज्जाच्या तलाठ्याची महिला शेतकऱ्याने केली आयुक्तांकडे तक्रार

0
10

बिलोली,दि.13 : तालुक्यातील सगरोळी सज्जाचे तलाठी पांडे हे दोन वर्षापासून सतत गैरहजर राहत असल्याने शैक्षणिक व शासकिय कामांना मोठे अडथळे येत आहेत मात्र जमिनीच्या फेरफार करण्यासाठी अथवा पेरा लावण्यासाठी मोठी रक्कम स्विकारून सुध्दा या गावातील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांचे कामे गेल्यान एक ते दोन वर्षापासून प्रलंबित आहेत यामुळे तलाठी पांडे यांच्या अक्षम्य दुर्लक्षीत काराभाराची तक्रार गुरूवार दि १३ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद व जिल्हाधिकारी नांदेड , उपविभागीय अधिकारी व तहसिलदार साहेब बिलोली यांच्याकडे तलाठी यांच्या कामाची चौकशी करावी अशी तक्रार सगरोळी येथिल महिला शेतकरी सविता सुरकुटलावार यांनी केली आहे.
सगरोळी हे बिलोली तालुक्यातील मोठे गाव असून येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे नेहमी वर्दळ असते. मात्र या सगरोळी सज्जात सध्या कार्यरत असलेले तलाठी पांडे हे सतत गैरहजर असतात त्यामुळे तलाठी कार्यालयाचा दरवाजा नेहमी बंदच राहत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. तलाठी पांडे हे पेरा लावणे , फेरफार करण्यासाठी संबंधित व्यक्तींकडून १० ते २० हजार रूपये घेऊन सुध्दा गेल्या दोन वर्षापासून गावातील ५० ते ६० शेतकऱ्यांचे आँनलाईन सातबारा नोंद केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन चाल ढकल करत असल्याची तक्रार महिला शेतकरी सविता सुरकुटलावार यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद , जिल्हाधिकारी नांदेड , उपविभागीय अधिकारी बिलोली व तहसिलदार बिलोली यांच्याकडे तक्रार केली आहे.