स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शनं

0
12
नागपूर, दि. 15 –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. मोदी यांनी दीक्षाभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी कोराडी येथे जात असताना पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं केली.शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्यासमोर ही निदर्शनं करण्यात आली.  यावेळी ‘अब ना चलेगा कोई बहाना, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ या घोषणांनी दीक्षाभूमीचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी नारेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे सुरेश लोलणो, शैलेंद्र हारोडे, संदीप सावरकर, अॅड.संजय नेरकर, राजीव तेलंग व फहीम अंसारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.