शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे तीन तालुक्यात धरणे आंदोलन

0
13

लाखनी/साकोली/लाखांदूर,दि.15 :भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने लाखनी,लाखांदूर व साकोली तालुक्याच्या मुख्यालयी शेतकर्यांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांना घेऊन एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. लाखनी तालुका व शहर राष्टॅ्वादीच्यावतीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफ करा, ग्रामीण रूग्णालय लाखनी तसेच पालांदूर येथील दवाखान्यात सोयीसुविधा पूर्ण करा, लाखनी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करा अशा विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय लाखनीसमोर करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, नेते सुनिल फुंडे, धनंजय दलाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अभिषेक कारेमोरे, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, अविनाश ब्राम्हणकर, दामाजी खंडाईत, लाखनी तालुका अध्यक्ष विकास गभणे, नगर पंचायत उपाध्यक्ष धनू व्यास, बाळा शिवणकर, नागेश पाटील वाघाये, गुणवंत दिघोरे, महिला अध्यक्ष उर्मिला आगाशे, शशीकांत भोयर, उपसरपंच निलेश गाढवे, प्रशांत मेश्राम यांनी केले. आंदोलनादरम्यान नेत्यांची भाषणे झालीत. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते. आंदोलनासाठी प्रशांत चाचाने, सुनिंल चाफले, विनोद आगलावे, सुधीर संदनवार, नितीन निर्वाण, राजेश राघोर्ते, मंदा गभने, डोलीराम झंझाड, आयशा बेगम, सुनिल भांडारकर, सुरेश बोपचे, रवी खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लाखांदूर : भाजप सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. त्यांच्या विविध मागणी संदर्भात लाखांदूर तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनेतहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदार तोडसाम यांना निवेदन देण्यात आले. यात प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा, विजेचे बिल कमी करावे, शेतकऱ्यांच्या विविध समस्या या सरकारने सोडविल्या नाही. जनतेला भुलथापा मारून शेतकऱ्यांची निराशा या सरकारने केली आहे. त्यामुळे विविध शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या धरणे आंदोलनात मांडण्यात आल्या. यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी व सातबारा कोरा करावा, उन्हाळी धानाला तीन हजार रूपये भाव देण्यात यावा व ५०० रूपये बोनस जाहीर करावा, ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, वीज बिल कमी करून भारनियमण बंद करावे, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलन राकाँ जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, जि.प. सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा महासचिव धनंजय दलाल, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, जिल्हा महासचिव दिपक चिमणकर, राकाँ तालुका अध्यक्ष बालू चुन्ने, महिला अध्यक्ष कल्पना जाधव, वैशाली हटवार, उपसभापती देवीदास राऊत, नगरसेवक देवानंद नागदेवे, मोहन राऊत, शिलमंजू सिंव्हगडे, विनोद ढोरे, कांता मेश्राम, नरेश सोनटक्के, ईश्वर कुंभलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे कऱण्यात आले.

साकोली : येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.या धरणे आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सभापती नरेश डहारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, रामचंद्र कोहळे, कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे, लता परसगडे, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, हेमकृष्ण वाडीभस्मे, लता दुरुगकर, कौशल्याबाई नंदेश्वर उपस्थित होते.