दूषित पाण्यामुळे ९ नागरिकांना विषबाधा

0
13
यवतमाळ,दि.16 : माहूर तालुक्यातील चोरड येथील नऊ नागरिकांना दूषित पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चोरड येथे पाणीपुरवठा योजनेअंतर्गतच्या विहिरीचे नागरिकांनी पाणी पिल्याने मळमळ, संडास व उलट्याचा त्रास झाला. अंजना भोजने (३५), अरिता राठोड (१५) दर्शना संतोष पवार (२५), बेबी पवार (४0), पूजा अर्जुन राठोड (१८), प्रीती प्रेमसिंग पवार (१७), ऋतुजा पवार (१५), पिंकी पवार (१२), यशवंत भोजने (१0) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, या रुग्णांवर डॉ. नीरज कुंभारे, डॉ. धनश्री खराटे उपचार करीत आहेत. चोरड येथे आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले असून, गावातील नागरिकांवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार दूषित पाणी पिल्याने झाल्याचे तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव व संजय राठोड यांनी आरोग्य विभागास योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.