आमदाराच्या आक्षेपामुळेच आमगाव (खुर्द)चा न. प.मध्ये समावेश नाही

0
17

गोंदिया,दि.16(berartimes.com) : नगरविकास विभागाने प्रतिज्ञापत्र देऊनही सालेकसा नगरपंचायत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा आजपर्यंत समावेश केला नाही, असे अँड़ रवींद्र पांडे यांनी नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत हायकोर्टात अवमानना याचिका दाखल केली होती.त्यावर स्थानिक आमदारांनी आक्षेप घेतल्यामुळे आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश सालेकसा नगरपंचायतमध्ये केला नाही, असे प्रतिज्ञापत्र नगरविकास विभागाने आता पुन्हा दिले आहे.त्यामुळे या प्रकरणी न्या. भूषण गवई आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या समक्ष पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. याचिकार्त्यातर्फे अँड़ रवींद्र पाडे यांनी बाजू मांडली.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात यावा, या मागणीकरिता २0१५मध्ये नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सालेकसा ग्रामपंचायतीमध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र नगरविकास विभागाने दिले होते. नगरविकास विभागाचे सदर प्रतिज्ञापत्र हायकोर्टाने त्यावेळी रेकॉर्ड केले होते. दरम्यान, नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यात सालेकसा नगरपंचायत निवडणुकीचाही समावेश होता. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. परंतु, नगरविकास विभागाने आमगाव खुर्द ग्रामपंचायत समावेशाबाबत अधिसूचना जारी केली नाही. याच काळात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात अधिसूचना काढली होती. दरम्यान, नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे उपरोक्त ग्रामपंचायतीचा न.प.मध्ये समावेश करण्यात आला नव्हता,त्यामुळे नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती.