भंडारा,दि.18 : भंडारा शहरातील युवा डाॅक्टरांने सलाईनमधून विष घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना आज मंगळवारला उघडकीस आली आहे. 30 वर्षीय डॉ. प्रितिश भोयर यांने राहत्या घरी आत्महत्या केली.भोयर हे भंडाऱ्यातील गुजराती कॉलनीमध्ये राहत होते.चर्मरोग तज्ज्ञ असलेले डॉ. प्रितिश भोयर हे एमबीबीएस, एमडी होते. ते स्वतःचे क्लिनिक चालवायचे.सलाईनच्या माध्यमातून विष घेऊन डॉ. प्रितिश भोयर यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यानुसार, पोटाच्या विकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.