सुकळीत सर्वधर्मीय २५ जोडप्यांचे शुभमंगल

0
10

तिरोडा,दि.18 : श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तिरोडा तालुक्यातील सुकड़ी डाकरामच्या श्री चक्रधर स्वामी देवस्थानात पंचमीला (दि.१६) हजारो वऱ्हाडांच्या उपस्थितीत सर्वधर्मिय सामूहिक विवाह समारंभ पार पडला. यावेळी विविध हिंदू, बौद्ध धर्मातील विविध जातींच्या २५ जोडप्यांचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

माजी आ.दिलीप बन्सोड यांच्या पुढाकाराने गेल्या १० वर्षांपासून सुकडीत ही सामूहिक विवाहाची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. श्री चक्रधर स्वामींच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.राजेंद्र जैन, भजनदास वैद्य, मधुकर कुकडे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जि.प.सदस्य पंचम बिसेन, माजी उपाध्यक्ष मदन पटले, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, वीणा बिसेन, राधेलाल पटले, अदानी फाउंडेशनचे प्रभारी शिरोडकर, संजय टेंभरे, सुनीता मडावी, डुमेश चौरागडे, अनिता रहांगडाले, जवाहर पटले, अमृतलाल असाटी, गुड्डू असाटी, विलास मेश्राम, सुनील चौरागडे, विशाल शेंडे, प्रेम रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विवाहबद्ध झालेल्या २५ जोडप्यांपैकी ७ बौद्ध समाजाचे तर १८ हिंदू जातीमधील जोडप्यांचा समावेश होता. या जोडप्यांना अदानी फाऊंडेशन व इतर दानदात्यांच्या सहकार्याने प्रत्येकी एक आलमारी, पलंग, गादी आणि जीवनोपयोगी १४ भांडी भेट म्हणून दिलीप बंसोड़, अर्चना बंसोड़, व अतिथिंच्या हस्ते देण्यात आले.