बीआरएसपीचे बंद सीटीस्कन मशीनसाठी आंदोलन

0
12

गोंदिया,दि.20-गोंदिया येथील शासकीय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात गेल्या अनके वर्षापासून बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनला सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी्च्यातीने आज गुरुवारला(दि.20) जिल्हा कुवर तिलकंसिह सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय परिसरात धरणे आंदोलन आले. गोरगरीब तसेच ग्रामीण व शहरी रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागते.खासदार,पालकमंत्री,आमदार व जि.प.सदस्य हे निवडून आले परंतु त्यांनी समस्याकडे लक्ष न दिल्याने जनतेला त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप बीआरएसपीने केला आहे.या आंदोलनात सुधाकर शिवणकर,प्यारेलाल जांभुळकर,प्रफुल डोंगरे,दिपेन वासनिक,संजय बोहरे,डी.एस.मेश्राम आदींसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.