नागपूरात पारा 46 अंशावर; आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

0
8
नागपूर,दि.20– महाराष्ट्रात आतापर्यंत उष्माघाताच्या बळींची संख्या 10 वर पोहोचली आहे. बुधवारी चंद्रपूर येथील हारुन शेख (46) वाढत्या तापमानाचे बळी ठरले. पुणे हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. बुधवारी चंद्रपूर तर आज गुरुवारी राज्यात नागपूर येथे सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.विदर्भासह राज्यात असलेली उष्णतेची लाट अाणखी दाेन दिवस सक्रिय राहिल असा अंदाज आहे.आज गुरूवारी राज्यात नागपूर येथे सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. नागपूरमध्ये 18 एप्रिल रोजी पारा 45.5 अंशावर पोहोचत 10 वर्षांचे रेकॉर्ड मोडला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पारा 45.7 आणि आज 46.4 वर पोहोचला आहे.विदर्भात बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेले आहे. पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहिल.