37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ गोरेगाव तालुक्यात पालकमंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री सडक योजनेचे भूमीपूजन

गोरेगाव तालुक्यात पालकमंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री सडक योजनेचे भूमीपूजन

0
30

blank

गोरेगाव,दि.२4 : गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार ते मोहगाव  व मोहगाव तिल्ली ते कमरगाव या मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता बांधकामाचे भूमीपूजन राज्याचे सामाजिक न्याय व  पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. पठाणटोला येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले तसेच  कन्हारटोली व पालेवाडात
चावडीचे भूमीपूजन करण्णयात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, विश्वजीत डोंगरे, पं.स.सदस्य ललिता बहेकार, अलका काटेवार, माजी पं.स.सभापती डॉ.किशोर गौतम, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, सरपंच सुरजलाल पटले, उपसरपंच माया भगत यांची उपस्थिती होती.मुंडीपार येथील कार्यक्रमाला माजी आमदार हेमंत पटले,जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेंभेर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, कलपाथरी प्रकल्प बाधित ८ गावांना वाढीव मदत देण्यात येईल. कलपाथरी प्रकल्पाचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे यासाठी संबंधित विभागाचे नियोजन करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेता येईल. या परिसरातील ज्या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा गावांसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या मार्गावर बस फेऱ्या वाढविण्यात येईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, पलखेडा ते निंबा दरम्यान बससेवा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी जागरुक असले की, विकासाला गती मिळते हे पालकमंत्री बडोले यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्विकारुन विविध विकास कामांची सुरुवात करुन दाखवून दिले आहे. या परिसरातील ज्या गावांच्या समस्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यात येईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, गोंदिया जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याचे काम पालकमंत्री करीत आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला गती दिली आहे. त्यांच्या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे असेही त्या म्हणाल्या. यावेळी सभापती चौधरी व जि.प.सदस्य श्रीमती वालदे यांचेही समायोचित भाषणे झाली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव/तिल्ली येथील तुलसी कटरे व दीक्षा बहेकार यांना विद्यार्थीरत्न व पुर्णिमा रहांगडाले या विद्यार्थीनीला मोहगाव आयडॉल म्हणून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला मोहगाव/तिल्ली ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक बाबुलाल गौतम यांनी केले. संचालन शिक्षक अशोक चेटपे यांनी केले, उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार यांनी मानले.सुरेश कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

blank