गोन्हा ग्रा.प.च्या शौचालय बांधकामात गैरव्यवहार,बीडीओची भूमिका संशयास्पद

0
20

नागपूर,दि.30- जिल्ह्यातील कूही पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या गटग्रामपंचायत गोन्हा हे गाव गोसेखुर्दच्या बुडीत क्षेत्रात येते. गोन्हा व चिखली गावांत ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना राबविण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम करताना उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या उपस्थितीत मासिक ग्रा.पं. सभेत शौचालयाविषयी कुठलाही ठराव घेण्यात आला नाही. गोन्हा व चिखली गावांना अनुक्रमे १७२ व ४२ ऑनलाइन नावे आली. प्रतिलाभार्थ्याला १२ हजार रुपये अनुदान देण्यात येणार होते. मात्र सरपंच व सचिवाने ठेकेदाराला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे, अर्धवट व परिपूर्ण नसलेले शौचालय लाभार्थींच्या घरी उभे केले.गोन्हा येथे तुकाराम तलमले, श्रावण बावणे, वामन तलमले, बालचंद भोयर यांच्या घरी बांधलेल्या शौचालय बांधकामात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. खड्डय़ावर टाकलेल्या सिमेंट पत्र्याचे तुकडे झाले आहेत. शौचालयाचा खड्डा दोन बाय दोन फुटांचा केला आहे. खड्डय़ाच्या चारही बाजूला सिमेंटची पत्रे टाकण्यात आलीचारचा खड्डा खोदून तो विटांनी बांधावयाचा होता. तीन बाजूंनी भिंती उभारून त्याच्या एका बाजूला दार लावून शौचालयाची शिट बसवायची होती. हे बांधकाम लाभार्थीने स्वत: केले तर, त्याला १२ हजार रुपये देणे गरजेचे होते. परंतु सरपंच व सचिवाने तसे न करता शौचालय बनविण्याचे काम ठेकेदाराला दिले. काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर ग्रामस्थांनी आक्षेपकुही : ग्रामस्वच्छता व हागणदारीमुक्त गाव अभियानांतर्गत गोन्हा ग्रा.पं.ने शौचालयाचे बांधकाम हाती घेतले. मात्र ग्रामसेवकाने ठरावावर ग्रा.पं. सदस्याच्या खोट्या सह्या करून घरोघरी तयार करण्यात आलेल्या शौचालय बांधकामात भ्रष्टाचार केला. यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा १ मे रोजी महाराष्ट्रदिनी पं.स. कुहीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पत्रपरिषदेत दिला आहे.पत्रपरिषदेला उपसरपंच अमोल मरघडे, रतन मस्के, धनराज गोन्हा, अनीता भोयर, शैला लांडगे, रंजू पडोळे, आकाश भोयर, कृष्णा मने, सचिन लांडगे उपस्थित होते.