क्षत्रिय मराठा कलार सामु.विवाहसोहळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध

0
12

गोंदिया,दि.01- येथील क्षत्रिय मरठा कलार समाज सामूहिक विवाह सोहळा समितीच्यावतीने मुर्री मार्गावरील समाजसभागृहात अक्षय तृतियेच्या पर्वावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबध्द झाली.. यात गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर, रामपूर, बोदल, भोपाल जिल्ह्यातील मंडळी वर-वधू घेऊन समाज भवनामध्ये पोहचली होती.अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष मनीष चौरागडे होते. अतिथी म्हणून दामोदर दियावार, राकेश सेवईवार, महेंद्र डोहरे, पालक सेवईवार, डुमेश चौरागडे, माधो भोयर, सुरेश चौरागडे, नारायण प्रसाद, जमईवार, भागवत, धपाडे, मदन पालेवार, डॉ. अनिल चौरागडे, डॉ. राजे कावळे, तपन कावळे, सुरेश पिपलेवार, धरमलाल धुवारे, नंदकिशोर भोयर, अनूप सेवईवार, रामनारायण भोयर उपस्थित होते.महेंद्र डोहळे नागपूर यांनी समाज भवन, महिलांकरिता स्वतंत्र खोलीसाठी ५० हजार रूपये आपल्या वडिलांच्या स्मृतीत दिले, त्याचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक कलार समाजबांधवानी आर्थिक सहकार्य केले. वधूंना जीवनावश्यक वस्तू, भांडी, ताट, पाणी फिल्टर आदी वस्तू भेट देण्यात आल्या.

संचालन शरद डोहरे यांनी केले. आभार निलकंठ सिरसाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नवयुवक संघ, महिला संगठन समिती, शोभा धुवारे, सिंधू पिपरेवार, जयश्री सिरसाटे, आरती धपाडे, कांती बिजेवार, सुनिता डोहरे, मीना चौरागडे, चेतना डोहरे, सुनिता सोनवाने, अर्चना बारेवार, रिता बिडोवार, वंदना चौरागडे, नितू धुवारे, वर्षा चौरागडे व सर्व महिलांनी सहकार्य केले