ग्रामसेवकासह सरपंचही अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
14

गडचिरोली,दि.०३- गडचिरोली जिल्ह्यात येणाèया चांदाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकासह सरपंच आणि एक इसम दीड लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. गडचिरोली पोलिसात या लाचखोरांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून त्यांना गजाआड केले.
लाच घेणाèया आरोपींमध्ये ग्रामसेवक रोजलिन जगदीश खोब्रागडे, सरपंच राजेंद्र गजानन मेश्राम आणि राकेश पांडुरंग मेश्राम यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील चांदाळा ग्रामपंचायती अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतून इमारत बांधकाम करण्यात आले. यासाठी पुरवठा धारकाने या पंचायतीला ५ लाख ६२ हजार ५५० रुपयाचे साहित्य पुरविले. सदर बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक रोजलिन जगदीश खोब्रागडे हिने पुरवठाधारकाकडे १ लाख ३८ हजाराच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार पुरवठा धारकाने गडचिरोलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली.
यानुसार सापळा कारवाई करून २ मे रोजी सरपंच राजेंद्र मेश्राम (४२) आणि ग्रामसेवकाचे पती राकेश मेश्राम यांना प्रत्यक्ष लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक संजय दराडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महादेव टेकाम,हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहबले, नायक रवींद्र कात्रुजवार, सुधाकर दंडीकेवार, देवेद्र लाणबले, सोनल आत्राम, चालक घनशाम वडेट्टीवार, संदीप कुरवटकर यांनी केली.