२९0 दिव्यांगानी घेतला युनिक कार्ड शिबिराच लाभ

0
10

गोंदिया दि.04: येथील रेल्वे स्टेशन परिसरात दोन दिवशीय रेल्वे युनिक कार्ड शिबिराचे आयोजन १ व २ मे रोजी करण्यात आले होते.या शिबीरात २९0 दिव्यांगांना रेल्वे युनिक कार्डचे वितरण करण्यात येवून शिबिराची सांगता करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून दिव्यांगासाठी रेल्वे युनिक कार्ड देण्यात येतो. हे युनिक कार्ड आधी नागपूरवरून मिळत होते. त्यामुळे दिव्यांगाना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यापार्श्‍वभूमीवर खा.नाना पटोले यांच्या प्रयत्नाने गोंदियात दोन दिवशीय रेल्वे युनिक कार्ड शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद््घाटन खा. नाना पटोले यांनी केले होते. तर वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाचे अधिकारी ओ.पी.जायस्वाल,किशोर, गवलीकर आदी रेल्वे कर्मचारी व स्थानिक शल्यचिकित्सकांच्या हस्ते दिव्यांगाना नि:शुल्क रेल्वे कंसेशन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.