जबलपूर अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना दोन लाखाची आर्थिक मदत

0
9
????????????????????????????????????

गोंदिया,दि.13 : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी येथील ११ मजुरांचा मध्यप्रदेशातील जमुनियाजवळ ११ मे च्या मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला.त्या अपघातातील मृतक व जखमींच्या कुटुबियांची भेट घेऊन १२ मे रोजी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व मध्यप्रदेश सरकारच्या प्रतिनिधी म्हणून बालाघाट जिल्हा पंचायतच्या अध्यक्षा रेखा गौरीशंकर बिसेन यांनी  त्यांचे सांत्वन केले. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १ लाख रुपये व मध्यप्रदेश शासनातर्फे १ लाख असे दोन लाख रुपयाचा धनादेश मृतकांच्या कुटुंबीयांना देण्यात आले.तर प्रत्येकी 25 हजार रुपये जखमींना देण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रचनाताई गहाणे, पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी,पोलिस निरिक्षक केशव बावळे,जि.प.सदस्य शिला चव्हाण,माधुरी पाथोडे,तहसिलदार विठ्ठल परळीकर,पळसगाव सरपंच मंजुळा पराते, बोथली सरपंच गीता चव्हाण,घाटबोरीच्या सरपंच सुकेसिनि नागदेवे,सिंदीपारचे सरपंच जसंवत टेकाम,नगरसेवक शिव शर्मा,भरत क्षत्रिय व अन्य उपस्थित होते.यावेळी श्रीमती बिसेन यांनी सांगितले की घटना आमच्या मध्यप्रदेश राज्यात घडल्याने त्यांची मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो,आमच्या मदतीने कुंटूबांची झालेली हाणी भरुन निघू शकत नाही,परंतु सहकार्य व कुटूबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा महत्वाचा असतो असे सांगत आमचे सरकार या दुखात आपल्यासोबत असल्याचे सांगितले.