राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चर्चासत्र रविवारी

0
14

नागपूर,दि.20 :- राजीव गांधी स्टडी सर्कल विदर्भ विभाग नागपूरच्या वतीने भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रविवार २१ मे रोजी सकाळी ११ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, कॉग्रेसनगर येथे “राजीव गांधी: माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि भारतीय, राजकीय विकेद्रीकरणाचे निर्माते” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उदघाटन माजी मंत्री डॉ. अनिस अहमद यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री यादवराव देवगडे हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अतुल लोंढेे, नगरसेवक प्रफुल गुळधे, नगरसेवक बंटी शेळके, गिरीष पांडव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.