मांजरा नदि पाञातिल अवैध रेती उपसा बंद करा

0
23

भ्रष्टाचार निर्मुलन समिती व तालुका शिवसेनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बिलोली.( सय्यद रियाज) ,दि.20-तालुक्यातील बोळेगाव ,गंजगाव , नागनी ,येसगी ,येथिल मांजरा नदि पाञातुन गेल्या दिड ते दोन महीण्यापासुन लिलावाच्या व खाजगी परवानाच्या नावाखाली महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने ठेकेदारानी शासनाच्या कराराचा भंग करुन राञन-दिवस जेसिबि मशिनने रेती उपसा करुन पर्यावरणासह शासनाच्या महसुलीवर गंडातर ओढावले जात आहे.तात्काळ हा अवैध मार्गाचा अवलंब बंद करावा.आन्यथा तिवृ अंदोलन छेडण्याचा ईशारा काल दि.19 रोजी अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व तालुका शिवसेना प्रमुख यानी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे .
तालुक्यासाठी नैसर्गिक वरद हस्त लाभलेल्या या मांजरा नदि पाञाच्या आशिर्वादाने सदरील भागातिल हजारो हेक्टर शेती गेल्या सहा ते आठ वर्षापूर्वी सिंचन क्षेञाखाली होती.परीणामी शासनाकडुन महसुलीच्या आपेक्षे पोटि या भागातिल सगरोळी बोळेगाव ,गंजगाव ,येसगी ,नागनी ,माचनुर ,कार्ला या भागातिल रेती उपसा करण्यासाठी गेल्या दशकापासुन विविध अटि नियम घालुन शासकिय लिलावाच्या व खाजगी पट्ट्यातुन रेती उपसा परवाना दिला जात आहे .परंतु दिवसेंदिवस परवानाच्या नावाखाली आवैध उपस्याच्या प्रमाणात वाढ होत गेल्यामुळे या भागातिल दिवसेंदिवस जल पातळीवर दुष्परिणाम होत चाल्याने सिंचन शेती धोक्यात आली.
सध्या परस्थितित या भागातिल सहा तेआठ घाटाला रेती उपसा परवाना देण्यात आला.परंतु संबंधित ठेकेदार व महसुल प्रशासन यांच्या आर्थिक तडजोडीने शासकिय करारा भंग करीत राञन-दिवस प्रत्येकी घाटावर 3ते4जेसिबी मशिनचा सरासपणे वापर करित शेकडो फुट खोलीतून रेती उपसा केला जात आहे .यामुळे पर्यावरणासह महसुलीवर मोठे गंडातर ओढावले जात आहेत .याबाबतीवर आळा बसवावा यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी व सामाजिक ,राजकीय पक्षाच्या वतिने व दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनास जागे करण्याचे आनेक प्रयत्न अपयशी ठरत चालले .आवैध मार्गाने राञन-दिवस कोठ्यावधी रुपयाची कीमती रेती हजारो वाहानाच्या सहायाने तेलंगना ,कर्नाटक राज्यात तस्करी होत आहे.
सदरील घाटावर्ती जेसिबि च्या सहायाने परवानाच्या नावाखालची तस्करी रोखावी यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समीतीचे विभागिय अध्यक्ष राजु पाटिल शिंपाळकर शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे यानी दि.19 मे.रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देउन संबंधित दोषिवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली .अन्यथा तिवृ आदोंलन छेडण्याचा ईशाराही निवेदनावर देण्यात आला.या शिवाय सदर निवेदन महसुलमंञी महाराष्ट्र राज्य ,पालक मंञी ,विभागिय महसुल आयुक्त,यांच्याकडे ही देण्यात आल्या .सदरील निवेदनावर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतिल याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे .