स्वच्छ जि.प.च्या सभागृहात घाणीचे साम्राज्य

0
10

गोंदिया,दि.31: जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जातो. त्याच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या आणि लाखो रुपये दुरुस्तीच्या नावावर खर्च करुन खिसे भरणाèया अधिकाèयांसह पदाधिकाèयांना मात्र सभागृहातील घाण दिसेनासी झाली आहे.
या सभागृहात विविध कार्यक्रमासह जिल्हा परिषदांच्या विविध बैठका घेतल्या जातात. त्या बैठकांसह कार्यक्रमाला आलेल्यांना नास्ता दिला जातो. नास्ता दिल्यानंतर मात्र काही व्यक्ती नास्ता जसेच्या तसे सभागृहातील टेबलात ठेवत असल्याचे दिसून आले. गेल्या एक आठवड्यापासून या सभागृहातील टेबलामध्ये नास्ताची प्लेट व चहाचे कप जसेच्या तसे बघावयास मिळाल्याने स्वच्छतेच्या नावावर पैसा खर्च करणारी जिल्हा परिषद स्वत:च अस्वच्छतेचा संदेश देत असल्याचे बघावयास मिळाले. ङ्मा स्वच्छतेकडे प्रशासनाचे सरळ दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे. किमान सीईओ याकडे लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करतात की पाठबळ देतात याकडे लक्ष लागले आहे.