भाजप हा सत्तेसोबत संघटन मजबूत ठेवणारा पक्ष-आ.रहागंडाले

0
11

तिरोडा,दि.31-स्थानिक मातोश्री लॉन येथे भाजपा तालुका ग्रामीण व शहराची विस्तारीत बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीमध्ये पं.दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेची माहिती तसेच शिवार संवादबाबत प्रत्येक पदाधिकाèयाकडे पंचायत समितीनिहाय जबाबदारी सोपवून मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित १६ संचालकांचा सत्कार आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार रहागंडाले यांनी यावेळी उपाध्याय यांच्या एकात्मवाद, मानववाद व अंतोदय विचारसंकल्पनेबाबत माहिती दिली.त्यांचे विचार गावागावत पोचविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य, रविकांत बोपचे,मदन पटले, भाऊराव कठाणे,सलाम शेख, तुमेश्वरी बघेले, सोनाली देशपांडे,रजनी कुंभरे,राजेश गुणेरिया, qचतामण रंहागडाले,श्रावण रहांगडाले,अनिता अरोरा, राखी गुणेरिया,जितेंद्र रहागंडाले,तेजराम चव्हाण,चतुर्भूज बिसेन, तिरुपती राणे,बी.एस.रहागंडाले,डॉ.वसंत भगत,उमाकांत हारोडे, राजेश रहागंडाले आदी उपस्थित होते.संचालन मदन पटले यांनी केले.