माजी जि.प.अध्यक्ष सिंगनजुडेंचे निधन

0
10

भंडारा,दि.५- भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भंडारा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोहरभाऊ सिंगनजुडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सोमवारला सकाळी 11.45 वाजेच्या दरम्यान  निधन झाले. ते 61 वर्षाचे होते.त्यांच्यावर आज सायकांळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचा मृतदेह त्यांचे पैतृक गाव खरबी येथे नेण्यात आले आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.