नाकाडोंगरीत शिवसेनेचा ‘आक्रोश’आंदोलन

0
15

तुमसर,दि.15 :  केंद्र तसेच राज्य सरकार ग्रामीण भागात अनेक योजना राबवित असल्याच्या अनेक जाहिराती करीत आहे. मात्र, आदिवासी बहुल भागात या योजनेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नाकाडोंगरी येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.नाकाडोंगरी परिसरात पिण्याचे पाणी, गॅस गोडाऊन, रस्ते, व वनविभागाने नागरिकांना गॅस वाटप करावे या मागणीला घेऊन शिवसेनेच्या वतीने बुधवारला जेलभरो आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र पटले, पं. स. उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, अमित मेश्राम, तालुका प्रमुख नरेश उचीबगले, अनिल दुर्गकर, प्रकाश लसुन्ते, युवसेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, कामगार सेनेचे मनोहर जांगळ, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, वाहतूक सेना शहर प्रमुख किशोर यादव, उपशहर प्रमुख कृपाशंकर डहरवाल, धर्मेन्द्र धकेता, विजय बर्वे, राजेश धुर्वे, आर. भांडके, बारेलाल अगाशे, शाम बिसने, नरेष टेंभरे, संपत बांगरे, जितेंद्र सरयाम, सुनील पारधी, महेंद्र राऊत, प्रशांत गेडाम, कैलाश सूर्यवंशी, गुड्डू बिसने, देवा गौपाले सह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामवासी उपस्थित होते.

नाकाडोंगरी परिसरातील जवळपास १५ गावांना दूषित पाणि पुरवठा होतो, व ग्रामीण भागातील नागरिकांना पक्का रस्ता नाही. एकीकडे शासनाने प्रत्येक गावांना शहरी रस्त्यांनी जोडल्याचे सांगत आहे. मात्र या ठिकाणी उलटी परिस्थिती आहे करीता शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित झाले होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्या १० दिवसात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सेनेने आंदोलन मागे घेतले. १० दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले नाही, तर शिवसेनेच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन काढणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने यावेळी इशारा देण्यात आला.