आमदार किर्तीकुमार भांगडीयानी दिले मधुकरला नवजिवन

0
10

चिमूर,दि.15- तालुक्यातील नेरी येथील मधुकर पिसे या मध्यमवर्गीय इसमाला हृदयाचा त्रास असल्याने नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु नामांकित रुग्णालयातील आर्थिक खर्च अवाख्याबाहेरचा त्यातच आर्थिक अडचणीमुळे मधुकर उपचाराअभावीच परत आला.ही माहिती भाजयुमो तालुका महामंत्री संदीप पिसे यांना होताच त्यांनी पुढाकार घेऊन आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना माहिती दिली.आणि आमदार भांगडिया यांनी मधुकरला नागपूरला बोलावरून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च स्वत उचलून उपचार केल्याने मधुकरला नवसंजिवनी मिळाली आहे.
नेरी येथील मधुकर पिसेची  इंजिओग्राफी करण्यात आल्यावर ब्लाकेज असल्याचे समोर आल्याने शस्त्रक्रियेसाठी एक लाख साठ हजार रुपयाचा खर्च लागत होता.तेवढे पैसे नसल्याने उपचार न करताच परतल्याचे भाजयुमो तालुका महामंत्री संदीप पिसे व नरेंद्र पंधरे यांनी आमदार कीर्तीकुमार भागडीया याच्या लक्षाच आणून दिले. तेव्हा आमदार किर्तीकुमार भागडीया यांनी तात्काळ देवेंद्र गणवीर यांना माहिती देत मधुकरवर शस्त्रक्रिया करण्यासंबधी सुचना दिल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकला अन्यथा मधुकरला आपला जीव गमवावा लागला असता.