ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष -संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0
19

चिमूर,दि.15- तालुक्यातील ग्रामसेवकाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी १८ मे पासून असहकार आंदोलन सुरू केलेले असतानाही चिमूर पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने अद्यापही दखल न घेतल्याने ग्रामसेवक संघटनेने हे आंदोलन अधिक त्रीव करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा चिमूरच्या वतीने हे असहकार आदोलन सुरू असल्याची माहिती जिल्हा सरचीटनिस पद्माकर अल्लीवार ,जिल्हा उपाध्यक्ष एम बी मडावी, तालुका अध्यक्ष एस डी ठाकरे, सचिव आर एम गुरनुले यांनी सुरु असल्याची माहिती दिली.

ग्रामसेवक संवर्गाच्या मागण्या मग्रारोहयो अंतर्गत उशिरा झालेल्या मजुरी वाटप बाबत संघटनेने दिलेल्या  25 जुले २०१६ रोजी दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही.ग्रामसेवकाच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या डीले पेमेंटच्या  हजेरी पत्रकाचे विवरण व ग्रामसेवकाच्या डीले पेमेंटशी संबंध नाही अशी वेतनातून कपात झालेली रकम परत करण्यात यावी.माहितीच्या अधिकार अंतर्गत वारंवार माहिती मागवून प्रशासनाला व ग्रामसेवकाला वेठीस धरणाऱ्या विलास डांगेचे नाव काळया यादीत टाकण्यात यावे.पंचायत समितीला जमा असणाऱ्या ग्रामसेवकाना ग्राम पंचायती देण्यात यावे.अतिरीक्त सांझा सांभाळणाऱ्या ग्रामसेवकाना शासन निर्णय प्रमाणे मोबदला देण्यात यावे,कंत्राटी ग्रामसेवकाना रुजू होताना भरण्यात आलेली दहा हजार रुपये रकम तीन वर्षे झाल्यानंतर परत देण्यात यावी. ग्रामसेवकाचे प्रलंबित प्रवास भते बिल काढून देण्यात यावे,ग्रामविकास अधिकारीचा प्रभार ग्राम विकास अधिकाऱ्यांना देण्यात यावा,ग्रामसेवकाचे मासिक पे स्लिप पुरविणे,वरिष्ठ वेतन श्रेणीव कालबध्द पदोन्नतीसाठी पात्र यादया वरीष्ठाकडे सादर करण्यात यावे. भविषय निर्वाह निधीत जमा न केलेले  हप्ते त्वरित जमा करण्यात यावे, कंत्राटी ग्रामसेवकाचे वेतन वेळेवर करण्यात यावे, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत  लाभार्थ्याना द्यावयाचे प्रोत्साहन  अनुदान तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे,पंचायत विभागामध्ये स्थापना विभागातील जेष्ठ सहायक व कनिष्ठ सहायकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात यावे, ग्राम पंचायत स्तरावरील विविध योजनांची अंदाज पत्रके  पं. स. स्तरावरून तयार करून ग्राम पंचायतला देण्यात यावे,आदिवासी ग्रामंपंचायत साभांळणाऱ्या ग्रामसेवकाला आदिवासी भत्ता देण्यात यावे, सेवा पुस्तक अद्यावत  करणे,सुधारित ग्रेट पे लागू करणे ,ग्रेट पे वेतन निश्चिती व पडताळणी करणे या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानेच हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे.आंदोलन त्रीव करण्यासाठी झालेल्या सभेला एम व्ही लांबट, जी एस मानकर, सहसचिव आर एच येवले , पी व्ही गायकवाड, ए एस देवगडे, जी एस मासरकर, व्ही बी लांडगे, व्ही एस झिले, आर डि चांदेकर, एस वाय बुरडे  स्मिता वऱ्हाडी, केशव गजभे आदी उपस्थित होते.