24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ मनसे प्रणित शेतकरी सेना तालुका अध्यक्षपदी परशुराम ननावरे

मनसे प्रणित शेतकरी सेना तालुका अध्यक्षपदी परशुराम ननावरे

0
30

चिमूर,दि.15- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिमूर तालुका शेतकरी सेना अध्यक्षपदी परशुराम ननावरे यांची निवड मनसे नेते बाबा राजे जाधव यांनी केली आहे. परशुराम ननावरे हे जय लहरी जय मानव विद्यालयाचे सचिव असून ते माजी पंचायत समिती सदस्य आहेत. मनसेच्या निवडणुक चिन्हावर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणुक लढविली मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.त्यांची पक्षासाठी काम करण्याची इच्छा बघून त्यांच्यावर शेतकरी सेनेचे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ननावरे यांच्यानियुक्ती वेळी प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वंदिले, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सांदेकर ,तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्हे, शहर अध्यक्ष नितीन लोणारे,संजय वाकडे, महेंद्र तोटा वार आदी उपस्थित होते. त्यांच्या नियुक्ती मुळे मनसैनिकानी अभिनंदन केले आहे.

blank