गोड आवाजाच्या ज्योतीची गुणवत्तेतही उंच भरारी

0
12

नरेश तुप्तेवार
नांदेड, दि. 15 :संबंध महाराष्ट्रात आपल्या आवाजाने लोकांच्या ह्दयात घर करीत गुणवत्तेत तसुभर ही मागे न राहता ज्योतीने नावाप्रमाणेच ज्योत लावत दहावी परीक्षेत 99.20 % गुण घेऊन गुणवत्तेत ही उंच उंच भरारी घेतल्याने तीच्या आवाजाची व गुणवतेची ही चर्चा होत आहे.
पांगरी ता.लोहा येथील रहीवासी असलेले आवाजाचा बादशाहा म्हणुन सुत्रसंचलनाच्या रूपाने प्रसिद्ध असलेले प्रा.मारोती ब्रुद्रुक पाटील व त्यांची कन्या ज्योतीने व्हाईस रेकॉर्डींगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह पर राज्यात आपल्या बुलंद आवाजाने लोकांना मोहीत केले.ज्योतीने व्हाईस रेकॉर्डिंगसाठी आपल्या बापाला साथ देत तिने हे कमालीचे यश मिळविले.ज्योतीने खरच आज तिच्या नावाचे सार्थक करत ज्योत लावली.महाराष्ट्रासह अनेक राज्यात तीचा आवाज पोंहचला.तीने आपल्या बुलंद आवाज सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राष्ट्रीय व अनेक कंपन्या दुकानाच्या जाहीराती करण्यात तीने वेळ देत गुणवत्तेत ही तसुभर मागे न राहाता तीने १0 वी परीक्षेत ९९ .२०% गुण घेऊन गुणवत्तेतही तीने दबदबा कायम ठेवला.

ज्योती बुद्रुक ची प्रतिक्रिया

प्रचंड मेहनत,जिद्द,वेळेचे नियोजन करून आभास केल्यास यश प्रतेकाला मिळविता येते.आभ्यासाचे दडपण कधीही मी घेतले नाही.मी सहजपणे प्रत्येक गोष्ट मी सकारात्मक पणे मी केली.नुसत्या स्वपणाच्या हिंदोळ्यावर जगण्यापेक्षा स्वप्न सत्यात उतरण्याचा माझा यापुढेही प्रयत्न राहील.अधिकारी होण्याची माझी इच्छा असुन त्यासाठी मी कोणताही त्याग करेल अशी प्रतीक्रिया ज्योती बुद्रुक ने दिली.