जागृत युवा मंचने वाहिली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली

0
11

आलापल्ली दि. १५: :-देशात सध्या संतापलेल्या शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू असताना एकीकडे शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पोलिसांच्या गोळीबारात आपले प्राण गमवावे लागले. आपल्या न्यायसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याच देशात प्राणाची आहुती द्यावी लगते, ही शोकांतिका आहे. तसेच देशात आजवर झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शोक व्यक्त करीत स्वयं प्रेरणेने जागृत युवा मंचच्या वतीने बुधवारी आल्लापल्ली येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शासनव्यवस्थेने शेतकऱ्यांच्या समस्येकडे सतत दुर्लक्ष करून त्यांची व्यवस्था दयनीय अनाथ मुलांसारखी करून घेतली आहे. सरकारी आकडेवारी नुसार देशातील सुमारे साडे २६ कोटी लोकांचा चरितार्थ शेतीशी निगडीत आहे. आज देशभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर १२ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जाला कंटाळून देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. करीता कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलन पेटून उठले आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने उभारलेल्या आंदोलनाला फडणवीस सरकारने तितक्याच तात्काळ आणि तत्परतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जागृत युवा मंचने आभार मानले आहे.
शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, शेतकरी हा भारत पिता आहे, शेतकरी कमवतो तेंव्हा देश जगतो, हे सरकारने विसरता कामा नये. सरकारी भाषेत “तत्वत: मान्य” ह्या शब्दाला अनेक कंगोरे असतात. एखादा विषय लाम्बीवर टाकायचा असल्यास त्यास तत्वता मान्यता देवून टाकली जाते. आजवर अशे अनेक विषय तत्वत: मान्यतेच्या फायलीत बंद आहे. त्यामुळे ह्याच तत्वतेच्या आधारावर सरकारने शेतकऱ्यांची दिशाभुल करू नये अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. सदर कार्यक्रम आलापल्ली येथे साय ६:3३० वाजता पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे ,युवा विकास संस्थेचे रूपेश गावडे,रवी गज्जल्वार, विजेंद्र शील,मंगेश उईके, मुरलीधर तुलावी,रमेश मडावी,अंकुर ज्योतिषी, मनोज गेडाम,कु. प्रियंका मिटपल्लीवार,विजया खोब्रागडे, सुजाता खोब्रागडे,भारती शात्रकार आदि उपस्थित होते.