चिचेवाडा ग्रामपंचायतीची विभागीय चमूकडून पाहणी

0
8

देवरी,दि.16-संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकविणार्‍या आणि मुंबई येथे गौरव झालेल्या चिचेवाडा ग्रामपंचायतीची पाहणी नुकतीच विभागीय आयुक्त चमूकडून करण्यात आली.
विभागीय चमूमध्ये वर्धा जिप अध्यक्ष नितीन मडावी, उपायुक्त (विकास) विपूल जाधव, मुख्य अभियंता विजय जगतारे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे सहायक संचालक जगन्नाथ पाटील, शाखा अभियंता अरूण पोहणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समावेश होता.
या चमूने ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावातील सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सेवा, डासमुक्त योजनेतील शोषखड्डे, प्राथमिक शाळेतील शिक्षण व भौतिक सुविधा आदींची पाहणी केली.
यावेळी विभागीय चमूसोबत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा) देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, सरीता रहांगडाले, पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, जेठभावडाचे सरपंच डॉ. रहांगडाले, खंडविकास अधिकारी मनोज हिरूडकर, दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे कुलदिप लांजेवार, विस्तार अधिकारी पराते आदी उपस्थित होते.