रविवारला गडचिरोलीत दिल्ली ओबीसी महाधिवेशनसंबधी नियोजन बैठक

0
5
गडचिरोली,दि.17- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या 7 ऑगस्टला नवी दिल्ली येथे  आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या पूर्व नियोजनांसंबधीची गडचिरोली जिल्हा बैठक उद्या रविवारला संत गोरोबा वाचनालय रेड्डीगोदाम जवळ सायकांळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत नॉनक्रिमिलीयर तसेच रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.ओबीसी महाधिवेशनाबाबत नियोजन करण्यात येणार आहे.या अधिवेशनाला दिल्लीला येणाऱ्या इच्छुकांनी उद्या बैठकीला उपस्थित रहावे तसेच शेजारील राज्य तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील ओबीसीत सक्रिय काम करणाऱ्या संघटना व महाराष्ट्रातील ओबीसी संघटना सहभागी होणार असल्याने ओबीसी बांधवानी बैठकिला उपस्थित राहून नियोजनात सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर , राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे, दादाजी चापले , विनायक बांदुरकर,तुषार वैरागडे,राहुल भांडेकर, नयन कुनघाडकर, शुभम भस्मावार,साईनाथ जेंगठे ,प्रीतम ठाकरे ,अक्षय ठाकरे , अतुल वाढई , प्रदीप ठेंगरी, पंकज धोटे, उमेश गजपेलीवर, अमोल धाबेकर,केशव लंजे,चेतन शेंडे,बादल गडपायले,भुपेंद्र चौधरी,रमेश निखुरे,विकास निकोडे,रमेश जेंगटे,पंकज खोबे, तुषार मंगर, मंगेश वासेकर  यांनी केले आहे.