शौचालयासंबंधी करवसुली अट रद्द-सभापती कटारे

0
17

चिमूर,दि.21- नगरपरिषद क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी भारत स्वच्छ योजनेअंतर्गत ज्याचेकडे शौचालय नाही अश्या लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे आदेश दिल्या जात असून देयके देत असताना कर भरणा करा, अशी सक्ती नप प्रशासन करीत असताना सर्व सामान्य लाभार्थ्यांना फटका बसत होता ही गंभीर बाब लाभार्थ्यांनी न.प. बाधकाम सभापती नितीन कटारे याचे लक्षात आणून दिल्यावर मुख्याधिकारी मनोजकुमार शहा याचे सोबत सविस्तर चर्चा करून ती कर भरणा अट रद्द करवून घेतली.
चिमूर नप हद्दीत बरेचसे नागरिकांकडे कर मात्र हजारो, लाखो रुपये थकित असतात अश्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक असताना मात्र नप प्रशासन सामान्य नागरिकांना वेठीस धरून शौचालय लाभार्थ्यांना करभरणा सक्तीची करीत होते याचा फटका बसत असताना याची दखल नप बांधकाम सभापती नीतीन कटारे यांनी घेतली कर भरणाविषयी मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांचेशी सविस्तर चर्चा करून ती सक्ती करभरणा अट रद्द करून सर्व शौचालय लाभार्थ्यांना देयके मिळण्यासाठी त्यांना दिलासा मिळालेला आहे.
चिमूर नगर परिषद मध्ये न.प चे शिल्पकार आमदार कीर्तिकुमार भांगडिया याच्या मार्गदर्शनातून विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचे कामे चालू आहे. विकासाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती न.प. बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी दिली.