25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ नक्षलग्रस्त कमलापुरात पोचले जिल्हाधिकारी नायक

नक्षलग्रस्त कमलापुरात पोचले जिल्हाधिकारी नायक

0
23

सुचित जम्बोजवार
आलापल्ली,दि.23– गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांनी आज शुक्रवारला अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलापूर गावात दाखल होऊन नागरिकांशी सवांद साधला.यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी कमलापूर येथील तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.कमलापूर येथील तलावाचे तब्बल २७ वर्षानंतर खोलीकरण केले जात आहे. तलावाचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकरी व सरपंचांनी वारंवार जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी नायक यांनी दखल घेत तलावाचे खोलीकरण करण्याचे काम तत्काळ मंजूर केले. या तलावाचे खोलीकरण केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी समधान व्यक्त केले आहे. शेतीला मुबलक पाणी मिळणार असून शेतकर्यांची सिंचनाची सुविधा अधिक मजबूत होणार आहे.  तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठीच आज जिल्हाधिकारी थेट कमलापूरात पोहचले. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार प्रशांत घोरूडे, सरपंचा रजनिता मडावी, संतोष ताटीकोंडावार, राजु आत्राम, सुधीर रंगुवार, बकय्या चौधरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.