खा. नेते यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान, नेत्रतपासणी शिबिर

0
6

गडचिरोली,दि.29- भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त १ जुलै रोजी आरमोरी मार्गावरील संस्कृती सांस्कृतीक लॉनमध्ये रोगनिदान, नेत्रतपासणी, मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद््घाटन दुपारी २ वाजता आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजी आ. शोभाताई फडवणीस राहतील, प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा योगिता भांडेकर, आ. मितेश भांगडिया, आ. नागो गाणार, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, आ. बंटी भांगडिया, आ. संजय पुराम, आ. अतुल देशकर, आ. भैरवसिंग नागपुरे, आ. केशव मानकर, चंद्रपूर जि.प. उपाध्यक्षा क्रिष्णा सहारे, गोंदिया जि.प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, अरविंद सा. पोरेड्डीवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्षा शालुताई दंडवते, बाबुराव कोहळे, किसन नागदेवे, प्रकाश सा. पोरेड्डीवार, कृषी सभापती नाना नाकाडे, चंद्रपूरचे जि.प. बांधकाम सभापती संतोष तगडपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात नेत्रतपासणी व गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेची नोंदणी केली जाणार असून २ लाखांचा विमा काढला जाणार आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेचे पासबुक, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरा जास्तीत रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी गडचिरोली, खा. अशोक नेते मित्रपरिवार, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश गेडाम, भारत खटी यांनी केले आहे.