बालकांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’

0
12
गडचिरोली,दि.1 जुर्ले : ० ते १८ वयोगटातील हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्पंâ१ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी  पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी व विशेष शोध पथक कार्यरत राहणार आहे. ऑपरेशन मुस्कानर अंतर्गत १ जुलै २०१७ पर्यंत हरविलेल्या बालकांची यादी संकलीत करून  त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
 सर्व पोलीस घटकांच्या हद्दीत रेल्वे स्टेशन, बसस्थानके, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, धाबे, कारखाने येथील काम करणारी बालके, बालकामागार, कचरा गोळा करणारी बालके, बेवारस मुले यांची माहिती  घेऊन बालकांचे फोटोग्रॉफ्स, व्हिडीओद्वारे त्यांचे रेकार्ड तयार करून बेवारस बालके मिळून आल्यास योग्य त्या कारवाईनंतर त्यांना त्यांच्या पाल्यांच्या स्वाधिन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा महिला बाल विकास विभाग, बालकांशी सबंधीत काम करणाNया संस्था अशासकीय संस्था व प्रसारमाध्यमे यांचा सहभाग राहणार आहे.
प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक , विद्यार्थी व प्रत्येक नागरिकांनी  पोलीस विभागाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, गावात, गावाशेजारच्या परिसरात अशी बेवारस बालके आढळून आल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्याला  कळवून त्याची माहिती  जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी, व त्यांना पालकांंपर्यंत पोहचविण्यास मदत करावी, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.