शिवरा ग्राम पंचायत मधील दोषींवर कारवाई मात्र थंडब्स्त्यात

0
14

चिमूर,दि.08-चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिवरा ग्राम पंचायत मध्ये आर्थिक अपहार झाल्याची तक्रार नीलकंठ भुरे यांनी संबंधित यंत्रणेला वारंवार केल्या नंतरही संबंधित यंत्रणेने दोषी सरपंच व सचिवावर कारवाई केली नाही.त्यानंतर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनीही जिल्हा परिषदेच्या सीईओला १६ जानेवारी २०१७ ला पत्र देऊन कारवाईची मागणी केली.परंतु आमदाराच्या पत्राकडेही प्रशासनाने पाठ फिरवल्याने दोषीवरील कारवाईच थंडबस्त्यात पडल्याचे समोर आले आहे.
शिवरा ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच ,सचिव व रोजगरसेवक यांनी संगनमताने पांदण रस्ता , वृक्ष लागवड ,पाणी टाकणे प्रकार रोप वाटीका ,विखुरलेल्या स्वरूपाची वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा झाडे लावणे, गट रोपंन स्मशान भूमी आदी कामात अनियमितता केल्याची तक्रार भुरे यांनी केली होती.त्या तक्रारीवरील चौकशी अहवालात संबधितांना दोषी ठेवून वसुली करण्याचे आदेश यंत्रणेने दिला असतानाही वसुली कारवाई न करता प्रकरण थंडबस्त्यात ठेवल्याने संबधितावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ते भुरे यांनी केली आहे.