वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; उमरेड-करंडाला अभयारण्य लगतची घटना

0
16

नागपूर,दि.07- उमरेड-करंडाले अभयारण्याच्या गोठेगाव गेट लगतच्या भागात आज दुपारी एकच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. परबता राजाराम परतके असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना वाघाने ओढत जंगलात नेले होते. उत्तर वाळेगाव बिट परिसरात महिलेचा मृतदेह सापडला असून वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.