शिवसेनेचे आरोग्य शिबीर जनसेवा हीच ईश्वर सेवा

0
17

मोहाडी,दि.13-ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलली आरोग्य सेवा हिच आजही राज्यभर वर्षानुवर्षे सुरूच आहे.९ जुलै २०१७ ला जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कांद्री येथे हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ तुमसर, मोहाडी विधानसभा क्षेत्रात शिवसेना क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांच्या संयु्क्त विदयमानाने निशुल्क आरोग्य चिकित्सा, नेत्र परिक्षण, औषध वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिराचा मोठया संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र पटले यांचा गावकèयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिराला मुंबईवरून आलेले तज्ज्ञ डॉ्नटर उपस्थित होते.शिबिरात क्षेत्रातील ११२० नागरिकांनी तापासणी करून घेतील. आरोग्य शिबिराचा निष्कर्ष असा निघाला की, गावखेडयातील लोक आजही सुविधांपासून वंचीत आहेत. नागरिक विविध आजारांची त्रस्त आहेत.
खेडयातील लोकांना मोङ्कत सेवा मिळावी ही भावना लक्षात घेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंजी. राजेंद्र पटले मुंबईला जावून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिपक सावंत यांना भेटून तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्रातील ४१ गावात शिबिराचे निशुल्क आयोजन मंजूर करून आणले. आरोग्य शिबिर सतत ४९ दिवस विविध गावात वेगवेगळया स्थळी आयोजीत केले जात आहेत.
या शिबिरामध्ये इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचीबगले, वाहतूक सेना प्रमुखदिनेश पांडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, शहर प्रमुख नितीन चौबे, शहर प्रमुख नितीनसेलोकर, कामगार सेनेचे मनोहर जांगळे, उपशहर प्रमुख जगदिश त्रीभुवनकर, कृपाशंकर डहरवाल, कांद्री ग्रामचे सरपंच मनिष तुप्पट, उपसरपंच वर्षा बारई, सदस्य भरत राजुरकर, रूपचंद टेकाम, उमेश भामरे, डॉ. शु्नला, शहिद शेख, पिंटू विलंडकर, राजू पिकोरे, आसिङ्क शेख, पप्पू बालपांडे, प्रभाकर बारई, सुर्यकांत शिवरकर, रोशन बावनकुळे, सुजिता पिकारे, विना ठवकर, नालू बालपांडे, शामकला खोकडे, कार्र्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.